Wed, 24 Jan 2018 | 01:18 AM
News

चिमुरडीवर अत्याचार करणा-या नराधमास अटक

ठाणे-कळवा येथे एका अल्पवयीन मुलीला आपल्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली असून आरोपीस ठाणे पोलिसांनी शनिवारी सकाळी भांडुपमधून अटक केली आहे. रामआश्रय चौहान असे अटक करण्यात आलेल्या नराधमाचे नाव असून तो कळवा पूर्व येथे राहणारा आहे. त्याने त्याच परिसरात राहणाऱ्या एका ५ वर्षीय चिमुरडी घराबाहेर खेळत असताना तिला खाऊचे आमिष दाखवून तिला आपल्या घरी नेऊन तिच्यासोबत कुकर्म केले. याचदरम्यान, आपली मुलगी बराच वेळ घरी परतली नाही म्हणून पीडित मुलीच्या आईने तिचा शोध घेतला असता ती त्याच्या घरी रडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तिला घरी घेऊन आल्यावर तिच्यावर त्याने अत्याचार केल्याचे तिने सांगितले. त्यानंतर पीडित चिमुरडीच्या पालकांनी कळवा पोलिसात धाव घेवून आपली फिर्याद नोंदवली आहे.

News

घर का खर्चा मांगने पर पति ने पत्नी को जला दिया

News

चिमुरडीवर अत्याचार करणा-या नराधमास अटक

News

MUMBRA PROTEST AGAINST TERRORISM

View All